मेल पॅटर्न बाल्डनेस: पुरुषां मध्ये टक्कल पडण्याची कारणे व उपचार

4

Blog, Male Hair Loss | Dr Dhanraj Chavan | July 22, 2022

टक्कल पडण्याची कारणे व उपाय

Are you experiencing hair loss? Get in touch with the best of our hair specialists in Pune to understand your hair condition. For a hair treatment or to get hair transplant, book an appointment with our dermatologists near you, call +919584584111.

Table Of Contents

पुरुषांमध्ये टक्कल का पडते? (Reasons for Male Pattern Baldness)

टकलावर केस येण्यसाठी उपाय (Treatments for Male Pattern Baldness)

टक्कल पडणे ही अनेक पुरुषांची समस्या आहे. केस गळणे, पातळ होणे व त्यामुळे डोक्यावरील काही भागांवर टक्कल पडणे, केशरचना कमी होणे किंवा पूर्ण टक्कल पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. पुरुषांमध्ये बरेचदा डोक्याच्या पुढील व वरील भागावर टक्कल पडते आणि बहुतेकवेळा पुरुषांमधील टक्कल (male pattern baldness) हे अनुवंशिक असते. टक्कल पडणे अथवा केस गळणे ह्यामध्ये कोणत्याही वेदना होत नाहीत किंवा तो कुठला संसर्गजन्य आजारही नाही, परंतू ज्यांना टक्कल असते त्यांचा आत्मविश्वास सामान्यपणे कमी होतो व त्यांना लोकांत मिसळणे नकोसे वाटू शकते. त्यामुळे ते आपले टक्कल झाकू पाहतात किंवा केसांच्या वाढीसाठी उपचार शोधतात. टक्कल पडलेल्या जागीकेस येण्यासाठीचा कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, व टक्कल पडण्याचे नेमके कारण कोणते हे तज्ञाकडून जाणून घेणे महत्वाचे आहे.

तुम्हाला जर केस गळणे, टक्कल पडणे ह्यांसारख्या समस्या भेडसावत असतील, तर केशरोग/त्वचारोग तज्ञाचा सल्ला नक्की घ्या, पण ह्या लेखाचा उद्देश आहे, तुम्हाला केसांच्या ह्या समस्येविषयीची माहिती देणे, म्हणून इथे आपण पाहणार आहोत, टक्कल पडण्याची कारणे व टकलावर केस येण्यासाठीचे उपाय. (causes of hair loss and treatments for baldness) 

पुरुषांमध्ये टक्कल का पडते? (Reasons for Male Pattern Baldness)

 • टक्कल हे अनेकदा अनुवंशिक असते. त्याला काही जनुकीय कारणेही असतात.
 • हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केस गळतात ज्यामुळे टक्कल पडू शकते.
 • काही जीवनसत्वे तसेच इतर पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात व त्यामुळे टक्कल पडू शकते.
 • इतर काही शारीरिक आजारांमध्ये केसा गळतात, ज्यामुळे टक्कल पडू शकते, तसेच मानसिक तणावामुळेही केस गळतात, ज्याचे रूपांतर टक्कल पडण्यामध्ये होते.
 • काही औषधे किंवा रेडियशन सारखे काही उपचार ह्यांचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे केस गळू शकतात आणि टक्कल पडते.
 • काही केशरचना ज्याममध्ये केस ओढले जातात किंवा केसांवरील प्रक्रिया जसेकी केस कुरळे करणे, सरळ करणे, तसेच केसांवर रासायनिक पदार्थांचा प्रयोग केल्यामुळेही केस गळू शकतात, ज्यामुळे टक्कल पडते.

टकलावर केस येण्यसाठी उपाय (Treatments for Male Pattern Baldness)

 • केसांना नारळाचे तेल चोळून लावणे तसेच कांद्याचा रस, लिंबाचा रस अथवा अॅलोवेरा चा लेप लावणे हे घरगुती उपाय (home remedies for male pattern baldness) केल्यास केस गळणे बर्‍याच प्रमाणात थांबते व केसांच्या वाढीस मदत होते.
 • प्लेटलेट रिच प्लास्मा थेरपी (platelet rich plasma therapy) केसांची मुळे मजबुत बनवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. ह्या उपचार पद्धतीमध्ये रक्तातील प्लेटलेट-रिच प्लास्मा काढून तो डोक्यावरच्या टक्कल पाडलेल्या भागांमध्ये घातला जातो, ज्यायोगे केस वाढण्यास मदत होते.
 • मिझोथेरपी (mesotherapy for hair loss in men) ह्या उपचारामद्धे, जीवनसत्वांनी युक्त असा पदार्थ डोक्यावरील टक्कल पडलेल्या भागात घातला जातो, ज्याचा केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो.
 • मिनोक्सीडील व फिनास्टेराईड (Minoxidil and Finasteride) ही केस गळणे थांबवण्यासाठी ची एफ डी ए (FDA-approved) प्रमाणित औषढे आहेत, ज्यांचा वापर टक्कल कमी करण्यासाठी केला जातो.
 • टकलावर केस येण्यासाठी लेसर थेरपी (laser therapy) चाही चांगला उपयोग होतो, ज्यामध्ये लो लेव्हल लेसर डिवाईस (low level laser device)च्या साह्याने, टक्कल पडलेल्या भागावरील त्वचेला नवीन केशनिर्मिती साठी चालना दिली जाते.
 • केसांचे प्रत्यारोपण (hair transplant) हादेखील टक्कल कमी करण्यासाठीचा एक चांगला उपाय आहे. ह्या उपचार पद्धतीमध्ये, एका भागावरचे केस काढून, टक्कल पडलेल्या भागावर त्यांचे रोपण केले जाते.

ह्यातील कोणताही उपचार करून घेण्यापूर्वी ह्या क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केस गळणे व त्यामुळे पडणारे टक्कल ही जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची समस्या असेल, तर HairMD ह्या पुण्यातील हेयर ट्रान्सप्लांट सेंटर ला भेट द्या. तेथील अनुभवी केस व त्वचारोग तज्ञ तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील, व टकलावर केस येण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय सुचवतील. येथे उपचार घेतल्यानंतर, तुमची केस गळण्याची समस्या तर दूर होईलच, पण तुमचे केस आधिक सुंदर आणि मुलायम दिसू लागतील हेही नक्की.

Are you looking for hair fall solution? Get in touch with the best of our hair doctors in Pune to cure your hair loss. To book an appointment for a hair treatment or hair transplantation, contact our dermatologists near you, call +919584584111.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *