31st Aug, 2024

बहुतेकांना आपले केस काळे भोर असावेत असेच वाटत असते, पण प्रत्येकाचे केस अगदी शेवटपर्यंत काळे राहतीलच असे नाही. सर्वसाधारण पणे वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होतात. वय वाढत जाते तसे केस राखाडी किंवा पांढरे दिसू लागतात. काही जण ते डौलदारपणे मिरवतात आणि आपल्या केसांच्या सुंदर केशरचना करतात किंवा त्यांना मोकळे सोडतात आणि केसांच्या बदलत्या रंगाचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ देत नाहीत. वयस्कर लोकांना हे तुलनेने सहजपणे शक्य होते, परंतू, लहान वयात पिकलेले केस (premature graying of hair) वागवणे अवघड पडते.
पांढरे होत चाललेले केस आत्मविश्वासास बाधक ठरतात, आणि बहुतेक वेळा हे लोक, पांढरे केस झाकण्यासाठीचे उपाय शोधतात. लहान वयात पांढरे केस असण्याची कारणे अनेक असू शकतात, पण ही कारणे उद्भवूच नयेत ह्यासाठी काही करता येते का? पांढरे केस सारखे रंगवावे लागण्यापेक्षा, काळ्या केसांना पांढरे होऊच नाही दिले तर? शिवाय केस सतत रंगवल्याने, विशेषत: रासायनिक रंग वापरले तर त्याचा केसांवर विपरीत परिणाम होतो. काही लोकांना पांढरे केस दिसू नयेत म्हणून ते तोडायची किंवा कापायची सवय असते. हे देखील केसांसाठी हानीकारक ठरते. म्हणूनच केस पांढरे होण्याचे कारण जाणून घेणे आणि त्यावर योग्य तो उपचार घेणे महत्वाचे असते. ह्या लेखामद्धे आपण बघणार आहोत, केस पांढरे होण्याची कारणे व उपाय (causes of gray hair and how to prevent premature graying of hair).
What’s covered in the article?
- केस पांढरे होण्याची कारणे (White Hair Causes in Marathi)
- केस पांढरे न होण्यासाठी उपाय (Ways to Prevent Graying of Hair)
- पांढर्या केसांवर घरगुती उपाय व उपचार (How to Reverse Gray Hair?)
- Conclusion
केस पांढरे होण्याची कारणे (White Hair Causes in Marathi)
- वाढते वय (aging causes gray hair) हे केस पांढरे होण्यामागचे प्रमुख कारण आहे, परंतू लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे वेगळी आहेत. प्रत्येक वेळी केसांचे राखाडी किंवा पांढरे होणे हे वयसापेक्ष नसते.
- काही जनुकीय घटकांमुळे (genetics) केस पांढरे होतात.
- केस पांढरे होण्यामध्ये तुमच्या वांशिकतेचा प्रभाव असतो (race/ethnicity). जसे की अमेरिकी लोकांमध्ये केस पांढरे होण्याचे सरासरी वय २० एवढेच आहे, तर एशियन्स मध्ये ते वय २५-३० एवढे आहे. काही प्रांतातील लोकांचे केस इतर प्रदेशात राहणार्या लोकांच्या तुलनेत कमी किंवा अधिक लवकर पांढरे होतात.
- काही पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात (nutritional deficiencies cause white hair). जसे की जीवनसत्वे बी-६, बी-१२, डी आणि ई ह्यांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.
- शरीरातील antioxidants च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात. Antioxidants कमी असतील तर शरीरातील free radicals पेशींना इजा करतात ज्यामुळे Vitiligo सारखे आजार उद्भवू शकतात. Vitiligo मुळे केस पांढरे होतात.
- काही शारीरिक व्याधीममुळे केस पांढरे होतात. Alopecia Areata मध्ये केस गळतात, टक्कल पडते व नंतर उगवणारे केस बर्याचदा पांढरे असतात. शरीरातील melanin च्या कमीमुळे केस पांढरे होतात.
- केसांवर अति प्रमाणात रासायनिक प्रक्रिया केल्याने, किंवा रासायनिक पदार्थांचा वापर केल्याने केस पांढरे होऊ शकतात. (harsh chemicals or chemical hair treatments can lead to graying of hair)
- धूम्रपानामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढते. (smoking causes white hair)
- मानसिक ताण हे देखील केस पांढरे होण्यामागचे एक मुख्य कारण आहे. (stress can cause premature graying of hair)
केस पांढरे न होण्यासाठी उपाय (Ways to Prevent Graying of Hair)
- जनुकीय कारणांमुळे होणार्या पांढर्या केसांवर कोणताही उपाय किंवा उपचार नाही.
- जर एखाद्या व्याधीमुळे/आजारामुळे केस पांढरे झाले असतील तर त्या आजारावर योग्य ते उपचार झाल्यानंतर केसांवर झालेला परिणामही कमी होतो.
- केस पांढरे न होण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे किंवा मानसिक तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते.
- केसांवर रासायनिक पदार्थांचा मर्यादित वापर केल्यास, केस पांढरे न होण्यासाठी मदत होते. केसांची निगा राखण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यास केस पांढरे होणे टळू शकते.
- केसांची योग्य निगा राखणे हे केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. आठवड्यातून २-३ वेळा डोक्याला व केसांना तेलाचा मसाज करणे, केस वेळच्या वेळी धुणे, व हवेतील प्रदूषणापासून, उन्हापासून केसांना सुरक्षित ठेवणे, ह्या गोष्टी केस पांढरे न होण्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत.
- केसांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे कोणत्याही पोषकतत्वांची कमतरता उद्भवणार नाही आणि त्यामुळे केसांचे पांढरे होणे टाळता येऊ शकेल. मुख्यत: आहारात antioxidants चे प्रमाण वाढवल्याने केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
- धूम्रपान न करणे हे देखील केस पांढरे न होऊ देण्यासाठी पूरक ठरते.
- एक चांगली जीवनशैली अंगिकारल्यास, केसांचे आरोग्य तसेच तुमची तब्येत चांगली राहते।
पांढर्या केसांवर घरगुती उपाय व उपचार (How to Reverse Gray Hair?)
- कडुनिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास ते पांढरे न होण्यासाठी मदत होते.
- आवळ्याची पावडर किवा तेल केसांवर वापरल्यास, केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
- चहा पाण्यात उकळून ते पाणी केसांना लावल्यास केस कमी प्रमाणात पांढरे होतात.
- पांढर्या केसांवरील वैद्यकीय उपचार विचाराल, तर काही केसांवर लावण्याची औषधे तसेच काही पोटात घेण्याची औषधे आहेत जी पांढर्या केसांवर उपचारक ठरतात. ही औषधे घेण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Do You Know?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns?
(Your journey to healthier and fuller hair starts here!)
Meet Our Dermatologists
Conclusion
केवळ उपचार घेण्यापूर्वीच नाही तर केस पांढरे होण्यामागील कारणे जाणून घेण्यासाठीही त्या क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुमचे केस पांढरे होत असतील, तर वेळीच तुमच्या Dermatologist ला भेटा. तो तुमच्या आजाराचे योग्य निदान करेल आणि तुमचे केस पांढरे होण्यामागील कारणानुसार, त्यावर योग्य तो उपाय सांगेल. जर तुम्ही पुण्यातील एखाद्या चांगल्या त्वचारोग तज्ञा च्या शोधात असाल, तर HairMD ला नक्की भेट द्या. तेथील अनुभवी Doctors तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील आणि तुमचे केस पांढरे होण्याची कारणे व केस पांढरे न होण्यासाठीचे उपाय तुम्हाला सांगतील. त्यांच्या साह्याने तुम्हाला पुन्हा एकदा काळे भोर आणि सुंदर केस प्राप्त करता येतील.
Further Reading
IV Drips for Hair Growth: Myth or Miracle?
Hair fall issues? Know whether IV drip therapy can improve hair growth. Get evidence-based treatment plans at HairMD Pune.
Does Glutathione Cause Hair Whitening?
If glutathione can turn hair white or grey? HairMD Pune explains the truth, causes of greying, and safe ways to care for hair and scalp health.
Can Thin Hair Become Thick Again?
Is your hair thinning? Discover causes, treatments, and practical tips to regain thicker, healthier hair with HairMD Pune’s expert advice.
Monsoon Hair Care Tips | Healthy Hair in Every Season
Beat frizz, dandruff, and breakage this monsoon with our monsoon hair care tips. Get advice from a dermatologist in Pune to keep hair healthy all season!
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.