तसेच उन्हाचा केसांवर होणारा परिणाम आणि पावसाच्या पाण्याचा केसांवर व डोक्याच्या त्वचेवर होणारा परिणाम वेगळा आहे आणि म्हणूनच ह्या दोन ऋतूंमध्ये केसांची वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. पावसाळा तुमच्या केसांना काय करतो (how does monsoon affect your hair) आणि पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी (how to take care of hair during monsoon) ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा लेख नक्की वाचा.
What’s covered in the article?
- पावसाळा तुमच्या केसांना काय करतो? (Effects of Monsoon on Hair)
- पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे 10 उपाय (10 Monsoon Hair Care Tips and Tricks)
- Conclusion
पावसाळा तुमच्या केसांना काय करतो? (Effects of Monsoon on Hair)
- पावसाळ्यामद्धे बर्याच लोकांच्या केसांत कोंडा होतो.
- ह्या ऋतूमध्ये डोक्यावरील त्वचा तेलकट होते व केसांमधील तेलकटपणा वाढतो.
- अनेकदा पावसाळ्यामद्धे डोक्यावरील त्वचेला खाज सुटते.
- पावसाळ्यामद्धे काहींचे केस कोरडे होतात, ठिसूळ होतात, व गळतात.
- हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे केस गळणे, तुटणे व डोक्यावरील त्वचेला खाज सुटणे अशा अनेक समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे 10 उपाय (10 Monsoon Hair Care Tips and Tricks)
- तुमच्या केसांना व डोक्यावरील त्वचेला पावसाच्या पाण्यामध्ये ओले होण्यापासून वाचवा (Protect your hair from getting drenched in the rain). एकतर केसांना भिजू देऊ नका आणि डोके व केस पावसात भिजलेच, तर ते लगेच पुसून कोरडे करा. केस कोरडे करण्यासाठी शक्यतो microfiber टॉवेल चा वापर करा, जेणेकरून पाणी लवकर टिपले जाईल, व त्वचेला घर्षण कमी झाल्यामुळे केस गळणार नाहीत.
- पावसाच्या पाण्यात केस भिजले असतील तर ते नुसतेच कोरडे न करता, आधी केसांना स्वच्छ धुवा, जेणेकरून केसांतील माती, धूळ किंवा रासायनिक पदार्थ निघून जातील.
- ओल्या केसांना कंगव्याने विंचरू नका. पावसाळ्यामद्धे, मोठे दाते असलेल्या कंगव्याचा वापर करा जेणेकरून केसातील गुंता सोडवणे सोपे होईल. कंगवा स्वच्छ ठेवा, तसेच एकमेकांचे कंगवे वापरणे टाळा. ह्यामुळे scalp infections चा धोका कमी होईल. (Use a wide-toothed comb and do not comb wet hair)
- पावसाळ्यात केस शक्यतो छोटे ठेवा (keep the hair short in the rainy season). ह्यामुळे केस गळणे व ते विंचरताना तुटणे ह्यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत तसेच केसांची काळजी घेणे सोपे होईल.
- केसांचा कोरडेपणा, ठिसूळपणा व frizz अशा समस्या टाळण्यासाठी व केसांचे गळणे कमी करण्यासाठी तुमच्या केसांसाठी योग्य ठरेल असा शांपू, कंडिशनर व हेयर सीरम वापरा (use a suitable d shampoo, conditioner and hair serum during monsoon). कंडिशनरमुळे केस मऊ राहण्यास मदत होईल तसेच ते तजेलदार दिसतील. सीरम वापरल्याने केसांना खरखरीत होण्यापासून वाचवता येईल.
- पावसाळ्यात हमखास उद्भवणार्या केसांतील कुरळेपण (frizz) ह्या समस्येला दूर करण्यासाठी हेयर मास्क चा वापर करा. शक्यतो hydrating हेयर मास्क वापरा ज्यामुळे केसातील ओलावा टिकून राहील.
- पावसाळ्यात केस रंगवणे शक्यतो कमी करा. तसेच कोणत्याही हीट स्टाइलिंग उपचारपद्धती काळजीपूर्वकपणे करा (use heat styling instruments carefully and use hair dyes less frequently in monsoon), कारण उष्णतेमुळे केस व डोक्यावरील त्वचा कोरडी पडते व केस गळू शकतात.
- बाहेर जाताना शक्यतो केस बांधा (Tie your hair when going out in the rains). तुम्ही केसांचा अंबाडा किंवा पोनीटेल बांधू शकता जेणेकरून केसांमध्ये पाणी राहणार नाही व केसांना पावसाचे पाणी तसेच पावसाळी हवामानपासून सुरक्षित ठेवता येईल.
- पावसाळ्यामद्धे केसांना नारळाचे तेल लावा (oil your hair with coconut oil in monsoon) जेणेकरून केसांना पोषण मिळेल, बळकटी मिळेल व त्या भागातील रक्ताभिसरण वाढल्यामुळे केस तजेलदार व सुंदर दिसू शकतील. तेलामुळे केसांना एक सुरक्षा कवच मिळते ज्यामुळे केसांतील ओलावा टिकून राहतो. पावसाळ्यात केसांना तेल लावावे का? हो, आठवड्यातून दोन वेळा ट तेलाने केस व डोक्यावरील त्वचेला मसाज केल्यास केस चांगले राहण्यास मदत होते व केस तुटणे किंवा गळणे ह्यांसारख्या समस्या कमी होतात, तसेच केसांची चमक टिकून राहते.
- पावसाळा आला की आपल्याला हमखास तळकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतू मध्ये अशा पदार्थांचे अती सेवन करू नका. (Follow a healthy diet) पावसाळ्यामद्धे प्रथीने व जीवनमूल्ये असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खा, ज्या योगे व पावसाळी हवामानात देखील तुम्ही केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकाल.
DO YOU KNOW?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns
(15+ Years Of Expertise. 4157+ Successful Hair Transplant)
Meet Our Dermatologists
Conclusion
Further Reading
What is FUE Hair Transplant? Everything You Need to Know
Discover FUE hair transplant: procedure, pain management, costs, and expert insights from HairMD, Pune. Get the facts in one place
Hair Transplant Cost in Pune for 2026
Find affordable 2026 hair transplant costs in Pune with expert results by Dr. Dhanaraj Chavan. Transparent pricing and flexible payments.
Does Cold Water Really Help Your Hair? Separating Fact From Myth
You’ve heard that rinsing with cold water makes hair shinier and stronger.
What Should I Do About Dandruff and Scalp Issues?
Dandruff, seborrheic dermatitis, scalp psoriasis, and dry scalp, they look similar but need different treatments. HairMD dermatologists explain how to identify each and what actually works.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.










