6th March, 2024

उन्हामुळे केसांचा रंग आणि पोत बदलतो. घाम आल्यामुळे डोक्यावरील त्वचेला खाज सुटते, त्वचा व केस चिकट होतात, व अशा वेळी केस धुतले गेले नाहीत तर त्यांच्यामध्ये धूळ व वातावरणातील इतर कण साठून राहू शकतात, ज्यांचा केसांवर विपरीत परिणाम होतो. ह्या कारणांमुळे अनेक लोकांना उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न पडतो. ह्या लेखामद्धे आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठीचे १० उपाय (summer hair care tips).
What’s covered in the article?
- उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी १० उत्तम उपाय (10 Summer Hair Care Tips in Marathi)
- Conclusion
उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी १० उत्तम उपाय (10 Summer Hair Care Tips in Marathi)
- उन्हात बाहेर जाताना केसांना रुमाल अथवा टोपीने झाका, जेणेकरून केसांना उन्हापासून संरक्षण मिळेल (sun protection for hair).
- उन्हाळ्यात शक्यतो केस छोटे ठेवा (trim your hair in summer). त्यांना सैल पद्धतीने बांधा किंवा सैल अशा केशरचना करा (wear loose hairstyles during summer).
- ह्या ऋतुमध्ये moisturizing शांपू व कंडिशनरचा वापर करा (use a moisturizing shampoo and conditioner).
- ज्या उपकरणांच्या वापरामुळे केसांचे व डोक्यावरील त्वचेचे तापमान वाढते, जसेकी ironing tool, किंवा केस कुरळे करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण/यंत्र (curling iron) किंवा अशी कोणतीही प्रक्रिया ज्यामधे केसांवर उष्णतेचा वापर होतो, जसेकी blow drying अशा गोष्टी करणे टाळा (Avoid heating tools).
- केस उन्हाळ्यात घामामुळे चिकट होत असतील तर रोज किंवा एकदिवसाआड धुतले तरी चालतील.
- घामाने किंवा धुतल्यानंतर ओले झालेले केस ओढले गेले तर एकमेकांत गुंततात आणि हमखास तुटतात. म्हणूनच उन्हाळ्यात मोठे दाते असलेला कंगवा वापरा जेणेकरून केस तुटणार नाहीत.
- शक्यतो तेलाचा वापर टाळावा कारण तेलामुळे डॅन्डरफ चे प्रमाण वाढू शकते. अगदीच तेल लावायचे असल्यास केसांना अंघोळीपूर्वी अर्धा तास तेल लावावे व धुवून टाकावे, या मुळे केसांना कंडिशनिंग इफेक्ट येईल व केस मऊ राहायला मदत होईल.
- योग्य आहार व भरपूर पाणी पिणे (healthy diet and hydration) खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात, घामावाटे पाणी शरीराबाहेर पडते, त्यामुळे जास्त पाणी पिणे आवश्यक असते, तसेच आहारातूनही पाणी व व्हिटामिन्स योग्य प्रमाणात जाणे तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी, केसांना व त्वचेला नीट ठेवण्यासाठी, योग्य असा संतुलित आहार घ्या व खूप पाणी प्या. पाण्याबरोबरच फळांचे रस, नारळाचे पाणी अशा प्दार्थांचे सेवन केल्यास तुम्ही hydrated राहता ज्यामुळे, केसांना व त्वचेला योग्य ती पोषणतत्वे (nourishment) मिळतात.
- केसांना कोरडे करण्यासाठी खरखरीत towel वापरू नका. मऊ towel चा वापर करा. नेहमी हेयर प्रोटेक्टंट स्प्रे (hair protectant spray) चा वापर करा. केसांवर कोणतीही heat-based styling ची प्रकरीया करण्यापूर्वी केस कोरडे आहेत ह्याची खात्री करा.
- केसाममधील गुंता सोडवण्यासाठी कंगवा वापरण्या च्या ऐवजी bristle brush वापरा.
Do You Know?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns?
(Your journey to healthier and fuller hair starts here!)
Meet Our Dermatologists
Conclusion
Further Reading
Castor Oil: A Natural Solution for Hair Loss?
Find out how castor oil for hair loss can be a game-changer for thinning hair. Enhance your hair care routine today.
How to Reverse Grey Hair Naturally?
Discover how to reverse grey hair with safe, natural remedies. Expert advice from HairMD Pune for youthful and healthy-looking hair.
First-Time IV Drip for Hair Growth? Here’s What to Expect?
Considering IV drip for hair growth in Pune? Discover how the treatment works, what to expect in your first session, benefits, and safety insights at HairMD.
IV Vitamin Therapy: Does It Work?
IV vitamin therapy delivers nutrients directly into the bloodstream for skin glow, energy, and immunity. Know benefits, risks, and expert advice in Pune.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.