fbpx

Hair Care – हिवाळ्यात केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

4

Blog, Hair loss | Dr Dhanraj Chavan | December 24, 2022

Hair Care -हिवाळ्यात केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

Are you experiencing hair loss? Get in touch with the best of our hair specialists in Pune to understand your hair condition. For a hair treatment or to get hair transplant, book an appointment with our dermatologists near you, call +919584584111.

केस गळणे ही अनेकांमध्ये आढळणारी समस्या आहे. केस अनेक कारणांनी गळू शकतात. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात, तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही केस गळतात. अनुवंशिक कारणांमुळे तसेच काही जनुकीय घटकांमधील बदलांमुळेही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. मानसिक ताणामुळे केस गळतात. तसेच ज्या केशरचनांमध्ये केस ओढले जातात अथवा त्यांच्यावर ताण पडतो, अशा केशरचना वारंवार केल्यास केस गळू शकतात. केसांवर लावण्यासाठी रासायनिक पदार्थांचा अती वापर केल्यास केस गळू लागतात. केस गळणे हा एखादे औषध किंवा उपचार पद्धतीचा परिणाम देखील असू शकतो. वातावरणातील बदल, जसेकी ऋतू आणि त्यानुसार बदलणारे तापमान आणि हवेतील आर्द्रता ह्यांचाही केसांवर परिणाम होत असतो आणि प्रदूषणाचाही केसांवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे केस गळू शकतात

तापमान कमी झाल्याने आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्याने, हिवाळ्यात केस गळण्याची समस्या अनेकांमध्ये उद्भवते. हिवाळ्यात डोक्यावरची त्वचा कोरडी पडते, तिथल्या त्वचेला खाज येते (itchiness and irritation), कोंडा होतो (dandruff in winter), आणि अशा समस्यांची परिणती, केस गळण्यात होते. म्हणूनच, थंडी मध्ये केसांची व त्वचेची योग्य काळजी घेणे अधिक महत्वाचे ठरते. ह्या लेखामद्धे आपण बघणार आहोत हिवाळ्यात केस गळणे थांबवण्यासाठीचे काही रामबाण उपाय (ways to reduce hair fall in winter).

हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी (Winter Hair Care Tips in Marathi)

  • थंडीत बाहेर जात असाल तर टोपी वापरा आणि केसांना व डोक्यावरील त्वचेला थंडीपासून सुरक्षित ठेवा.
  • स्नान करताना खूप गरम पाण्याचा वापर टाळा, कारण थंडीमध्ये गरम पाणी चांगले वाटले, तरी त्याचा केसांवर आणि डोक्यावरील त्वचेवर विपरीत परिणाम होतो. अंघोळ करताना अथवा केस धुताना घेतलेले पाणी खूप गरम असेल तर त्वचा कोरडी पडते, आणि त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.
  • अशी कोणतीही उपचार पद्धत ज्यामधे केसांवर गरम हवेचा अथवा पाण्याचा वापर केला जातो, (heat treatment like curling, ironing) अशी उपचार पद्धत किंवा केसांवरील प्रक्रिया हिवाळ्यात कटाक्षाने टाळा. उष्णतेचा केसांवर वाईट परिणाम होतो आणि ते गळू लागतात.
  • केस पूर्णत: कोरडे केल्यानंतरच बाहेर पडा. (dry your hair before going out in winter) ओल्या केसांवर गार वारा लागल्याने केस गळू शकतात.
  • आठवड्यातून एकदा deep conditioning करा. ह्यामुळे थंडीत देखील केसांचा व डोक्यावरील त्वचेचा मुलायमपणा अबाधित राहतो.
  • केसांना व डोक्याला तेलाने नियमित मसाज करा. (oil massage for healthy hair) एरवीही ह्याचा फायदाच होतो परंतू विषेशकरून हिवाळ्यात तेल लावल्याने केसांचे गळणे कमी होते. डोक्याच्या त्वचेवरील कोंडा आणि खाज रोकण्यासही तेलामुळे मदत होते.
  • केसांना तेल लावायचे असेल तर केस धुण्यापूर्वी अर्धा तास तेल लावून लगेच धुणे चांगले. त्यामुळे केसांना कंडिशनिंग इफेक्ट येईल.
  • थंडीमध्ये हवेतील आर्द्रता कमी होते ज्यामुळे केसांमध्ये स्थीर वीज (static electricity) तयार होते. असे झाल्यास केस विंचरताना केस हमखास तुटतात. हे टाळण्यासाठी केस जपून, हलक्या हाताने विंचरा.
  • नेहमीच आणि विषेशत: हिवाळ्यात अशा केशरचना टाळा, ज्यांमध्ये केस ओढले जातात किंवा केसांवर ताण पडतो. अशा केशरचनांमूळे केस तुटण्याचा धोका असतो. (avoid hairstyles that pull the hair)
  • योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम ह्यांचा संपूर्ण आरोग्यावर जसा चांगला परिणाम होतो, तसाच त्वचा आणि केस ह्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यातही, चांगला आहार, व्यायाम आणि उत्तम जीवनशैली ह्यांची मदत होते.

तर हे होते, हिवाळ्यात केस गळणे थांबवण्यासाठीचे उपाय (how to stop hair fall in winter). ह्यावरून हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी (winter hair care), हे तुम्हाला कळलेच असेल. अर्थातच कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. जर घरगुती उपाय (home remedies for hair loss in winter) करूनही केसांचे गळणे कमी होत नसेल, किंवा तुम्हाला केस गळण्याची तीव्र समस्या  (excessive hair fall in winter) असेल, तर तुमच्या केस आणि त्वचा रोग तज्ञाला (Dermatologist) नक्की भेटा. तोच तुमच्या समस्येचे योग्य निदान करेल आणि तुम्हाला योग्य तो उपचार सांगेल. तुम्ही जर पुण्यातील एखाद्या ख्यातनाम त्वचा रोग तज्ञाच्या शोधात असाल, तर HairMD ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी doctors तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील.

Are you looking for hair fall solution? Get in touch with the best of our hair doctors in Pune to cure your hair loss. To book an appointment for a hair treatment or hair transplantation, contact our dermatologists near you, call +919584584111.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *