Blog, Male Hair Loss | Dhananjay Chavan | July 22, 2022
Table Of Contents
पुरुषांमध्ये टक्कल का पडते? (Reasons for Male Pattern Baldness)
टकलावर केस येण्यसाठी उपाय (Treatments for Male Pattern Baldness)
टक्कल पडणे ही अनेक पुरुषांची समस्या आहे. केस गळणे, पातळ होणे व त्यामुळे डोक्यावरील काही भागांवर टक्कल पडणे, केशरचना कमी होणे किंवा पूर्ण टक्कल पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. पुरुषांमध्ये बरेचदा डोक्याच्या पुढील व वरील भागावर टक्कल पडते आणि बहुतेकवेळा पुरुषांमधील टक्कल (male pattern baldness) हे अनुवंशिक असते. टक्कल पडणे अथवा केस गळणे ह्यामध्ये कोणत्याही वेदना होत नाहीत किंवा तो कुठला संसर्गजन्य आजारही नाही, परंतू ज्यांना टक्कल असते त्यांचा आत्मविश्वास सामान्यपणे कमी होतो व त्यांना लोकांत मिसळणे नकोसे वाटू शकते. त्यामुळे ते आपले टक्कल झाकू पाहतात किंवा केसांच्या वाढीसाठी उपचार शोधतात. टक्कल पडलेल्या जागीकेस येण्यासाठीचा कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, व टक्कल पडण्याचे नेमके कारण कोणते हे तज्ञाकडून जाणून घेणे महत्वाचे आहे.
तुम्हाला जर केस गळणे, टक्कल पडणे ह्यांसारख्या समस्या भेडसावत असतील, तर केशरोग/त्वचारोग तज्ञाचा सल्ला नक्की घ्या, पण ह्या लेखाचा उद्देश आहे, तुम्हाला केसांच्या ह्या समस्येविषयीची माहिती देणे, म्हणून इथे आपण पाहणार आहोत, टक्कल पडण्याची कारणे व टकलावर केस येण्यासाठीचे उपाय. (causes of hair loss and treatments for baldness)
ह्यातील कोणताही उपचार करून घेण्यापूर्वी ह्या क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केस गळणे व त्यामुळे पडणारे टक्कल ही जर तुमची किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची समस्या असेल, तर HairMD ह्या पुण्यातील हेयर ट्रान्सप्लांट सेंटर ला भेट द्या. तेथील अनुभवी केस व त्वचारोग तज्ञ तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील, व टकलावर केस येण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय सुचवतील. येथे उपचार घेतल्यानंतर, तुमची केस गळण्याची समस्या तर दूर होईलच, पण तुमचे केस आधिक सुंदर आणि मुलायम दिसू लागतील हेही नक्की.
Blog, Male Hair Loss|Dhananjay Chavan|
July 22, 2022
Monsoon is that time of the year when some of us are happy to get wet in the rains and prefer the outdoors to enjoy the breeze and the rains,...
Blog, Male Hair Loss|Dhananjay Chavan|
July 22, 2022
Best Scalp Treatments for Hair Growth Anti-dandruff Shampoo Oil Massage Scalp Serum Minoxidil Laser Therapy Platelet-rich Plasma Therapy Microneedling Mesotherapy Nano-fat Hair Restoration Hair Transplant Everyone wants silky, smooth hair... 18715